अर्धवट कामकाजामुळे , बेळगावच्या समर्थनगर येथील राजनाल्याला जोडलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनधारकांनी थोडीशी जरी चूक झाली तर थेट नाल्यात पडण्याची संभावना आहे .
बेळगावातील समर्थनगरच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. विशेषत: पावसाळ्यात येथील परिस्थिती अतिशय बिकट असते . . त्यांना रात्री जीव मुठीत घेऊन चालावे लागते. त्यातही पावसाळ्यात येथील राजनाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून, त्याला जोडलेल्या रस्त्यावर छोटे तलाव तयार झाले आहेत. क्षणभर या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनधारक विचलित होतात. खड्डे टाळण्यासाठी जाऊन अपघात होत आहेत. येथील स्थानिकांच्या वाहनांचे नुकसान होत असल्याने ऑटोचालक प्रशांत यांनी नाराजी व्यक्त केली.

येथे सुरू असलेले काम पूर्ण झाल्यानंतर नवीन रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र येथील कामाला विलंब होत आहे. जवळपास २ वर्षांपासून ते संथगतीने गतीने सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्यात या रस्त्याचा वापर करणे अवघड झाले आहे. स्थानिकांनाच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक नारायण भोसले यांनी सांगितले.
अनर्थ घडण्यापूर्वी जागरूक होऊन संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.


Recent Comments