सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळून घरमालकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत . धारवाड येथील व्यंकटपुर गावात सायंकाळी उशिरा घडली.
धारवाड तालुक्यातील व्यंकटपुर गावात ही दुर्घटना घडली असून घरमालक यल्लाप्पा इट्टी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत यल्लप्पा यांची सासू हनमव्वा व मुलगी जखमी झाले असून, जखमींना धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले . घराची भिंत कोसळल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले . गरग स्टेशनच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन कायदेशीर कारवाई केली.


Recent Comments