Belagavi

होनग्याची १४ वर्षीय बालिका डेंग्यूचा बळी ?

Share

बेळगावात एका 14 वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे .
मुसळधार पावसामुळे साथीचे आजार वाढत आहेत. बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील प्रणाली परशुराम उंदरे या 14 वर्षीय मुलीला ताप आल्याने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा फायदा न झाल्याने आज तिचा मृत्यू झाला. रूग्णालयासमोरील कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी म्हणाले की, जिल्ह्यात सुमारे 2000 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून सुमारे 301 सक्रिय रुग्ण आहेत. मात्र, जिल्ह्यात डेंग्यूचा अधिकृत रुग्ण आढळला नसल्याचे त्यांनी सांगितले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी अनेक दिवस पाणी साठवून ठेवणे टाळा. तसेच घरपरिसर स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले .

Tags: