savdatti

श्री यल्लमा देवीच्या दानपेटीत १. ९६ कोटींचे दान जमा

Share

कर्नाटकासहित महाराष्ट्र आणि गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती इथलं श्री यल्लमा देवीच्या मंदिरातील दानपेटी १. ९६ कोटी रुपये जमा झाले आहेत .  सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या मंदिराची दानपेटी खोलण्यात आली . गेल्या दोन महिन्यात , मंदिरात आलेल्या लाखो भाविकांनी , देवीला सढळ हस्ते दान अर्पण केले आहे . गेल्या दोन दिवसांपासून , मंदिराच्या दानपेटीतील रकमेची मोजदाद सुरु होती . दानपेटीतील दानाची इन कॅमेरा मोजणी करण्यात आली .

यल्लम्मा देवस्थानचे शासनाधिकारी , जिल्हाधिकारी आणि देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यांची रीतसर अनुमती घेऊन दानपेटी खोलण्यात आली . या दानपेटीतील रक्कम आणि मौल्यवान दागिने मोजण्यात आले . दानपेटीत १ कोटी ७१ लाख रुपये रोख रक्कम , २० लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोने, ४ लाख ४४ हजार रुपये किमतीची चांदी जमा झाली आहे . १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान मंदिरात आलेल्या भाविकांनी श्री रेणुकाचरणी हे दान अर्पण केले आहे .

ह्या रकमेचा विनियोग मंदिराच्या विकासासाठी तसेच भाविकांना पायाभूत सुविधांसाठी देण्यासाठी केला जाणार आहे . यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसय्या हिरेमठ , सदस्य वाय वाय काळप्पणावर , अभियंता ए बी मुल्लुर , सहाय्यक आयुक्त बसवराज जिरग्याळ , अधीक्षक नागरत्ना चोळण , कॅनरा बँक कर्मचारी व देवस्थाने कर्मचारी उपस्थित होते .

Tags: