khanapur

खानापुर तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागाची जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली पाहणी

Share

जिल्हा पालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या खानापुर तालुक्यातील भागांना भेट देऊन पाहणी केली.

खानापुर तालुक्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. येथील अनेक नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. आज जिल्हा पालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या घरांची पाहणी केली . मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाची पाहणी करून त्यावर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

त्यानंतर खानापूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर सार्वजनिक अहवाल प्राप्त करून जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासन व स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी खानापुरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमा शंकर गुळेद आदींचा सहभाग होता.

Tags: