gokak

गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने झाला प्रवाही

Share

पश्चिम घाटात झालेल्या चांगल्या पावसामुळे ‘भारताचा नायगरा’ म्हणून ओळखला जाणारा गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने झाला आहे. वाहणाऱ्या पाण्याचे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

गोकाक धबधबा फेसाळत ओसंडून वाहत आहे. हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी दोन डोळेही अपुरे पडतात . घटप्रभा आणि हिरण्यकेशी नद्या एकत्र आल्याने धबधब्यात पडणारे पाणी रोमांचित करते . गोकाक धबधबा गोकाक शहरापासून दहा किमी अंतरावर आहे. खडकांमधून वाहणारे पाणी 181 फूट उंचीवरून खाली कोसळते. धबधब्याचे वैभव पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येतात.


पर्यटकांना धबधबा जवळून पाहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. धबधब्याच्या शेवटी बॅरिकेड लावण्यात आले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नेमलेल्या जागेवर उभे राहून तरुण पुरुष आणि महिला सेल्फी काढताना आणि व्हिडिओचे रील्स बनवताना पाहणे येथे सामान्य आहे.

Tags: