Belagavi

पावसामुळे कॅम्प परिसरात झाड कोसळून दुचाकीचे नुकसान

Share

मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरात अनेक संकटे उद्भवली आहेत. शहरातील कॅम्प ग्लोब टॉकीजजवळ झाड उन्मळून दुचाकीवर पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे .

बेळगावात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची आपत्ती होत आहे. कॅम्प ग्लोब टॉकीजजवळ काल संध्याकाळी एक मोठं झाड कोसळलं. हे झाड दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे . तसेच दत्त मंदिराच्या छताचेही नुकसान झाले असून विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे . वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटवले.

अशी धोकादायक झाडे हटविण्याची मागणी करीत स्थानिकांनी याबाबत माहिती दिली. शहरात पावसामुळे झाडे उन्मळून पडत असल्याने लोकांनी झाडाखाली थांबू नये तसेच आपली वाहने झाडाखाली उभी करू नयेत असा सल्लाही वनविभागाने दिला आहे.

Tags: