Chikkodi

कोयना जलाशयातून 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग : चिक्कोडी तालुक्याला करावा लागणार पुराचा सामना

Share

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशय 75 टक्के भरले असून 78.29 टीएमसी पाणीसाठा झाला आहे मुसळधार पाऊस पडत असून पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.

काल सायंकाळी ७ वाजता कोयना जलाशयातून २० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कोयना कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे राधानगरी आणि काळम्मावाडी , चांदोली, तुळशी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

यामुळे चिक्कोडी उपविभागातील कृष्णा दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांची पाळीपातळी वाढणार आहे . त्यामुळे सीमावर्ती भागातील चिक्कोडी उपविभागासह कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना आणखी पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेजारील महाराष्ट्रात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Tags: