Belagavi

यंदेखूट परिसरातील पडलेला सिग्नलखांब रहदारी पोलिसांनी हटविला

Share

बेळगाव शहरात पावसाची संततधार सुरूच असून अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरु आहे. आज बेळगावमधील यंदेखूट येथील सिग्नलचा खांब देखील रस्त्यावर कोसळला होता मात्र वाहतूक पोलिसांनी तातडीने हा खांब हटविल्याने जनतेतून त्यांचे कौतुक होत आहे.

बेळगाव शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरु असून अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरु आहे. शहरातील यंदेखूट येथील वनिता विद्यालयाजवळील पावसामुळे खराब झालेला वाहतूक सिग्नल मोडकळीस आला होता. कालपासून सुरु असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे हा खांब रस्त्यावर कोसळून वाहतूक बंद झाली. मात्र दक्षिण विभागाच्या रहदारी पोलिसांनी तातडीने हा खांब बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली.

एएसआयएस गिझकट्टी, रवी हालन्नावर, परशुराम बिरादार आणि दक्षिण वाहतूक पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी खाली पडलेला सिग्नल खांब हटवून रस्ता मोकळा केला. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी केलेल्या या कार्याचे जनतेतून कौतुक होत आहे.

Tags: