महाराष्ट्रातील घाट भागात संततधार पावसामुळे कृष्णा आणि दूधगंगा नद्यांच्या काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पाऊस सुरू असून, कृष्णा आणि दूधगंगा नद्यांच्या काठावर पुराचा धोका निर्माण झाला आहे.
कृष्णा आणि दूधगंगा नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. नदीकाठच्या भागात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून कृष्णा नदीत १ लाख ८८ हजार क्युसेक विसर्गाची नोंद झाली आहे.
दूधगंगा नदीत ३५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू असून कृष्णा व दूधगंगा नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहेत .
चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ गावातील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तरीही कृष्णा खोऱ्यात २७ जुलैपर्यंत रेड अलर्ट असून क्षणाक्षणाला पूर येण्याची भीती व्यक्त होत आहे.


Recent Comments