Uncategorized

मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले अमननगर विकासाच्या प्रतीक्षेत

Share

बेळगावातील अमन नगरमध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत असून घरांमध्ये शिरल्याने स्थानिकांचे हाल होत आहेत.

आपल्या टीव्ही स्क्रीनवर दिसणारी दृश्ये ही जंगल किंवा शेतवाडीला जोडणाऱ्या रस्त्याची नसून स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमधील अमननगर येथील आहेत. या भागात रस्त्याच्या डाव्या बाजूच्या गल्ल्यांमध्ये गटारी तुंबल्या असून, पाणी दुसऱ्या ठिकाणी वळवण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची फरफट सुरु आहे.

याबाबत स्थानिक रहिवाशांनी इन न्यूजशी संवाद साधला. यावेळी इन न्यूज ला प्रतिक्रिया देताना येथील नागरिक म्हणाले, अमननगर मध्ये ४-५ वर्षांपासून रस्ते बांधले गेले नाहीत, गटारींची, ड्रेनेजची व्यवस्था नाही. पावसाळा सुरु झाला कि घरातून बाहेर पडता येणे मुश्किल होते.

 

या भागातील रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे, येथील समस्यांकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचे येथील रहिवासी जमादार यांनी सांगितले. या भागात गटारी, ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यातही सांडपाणी मिसळल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

Tags: