Belagavi

विद्यार्थ्यांना मिळाली आणखी दोन दिवस सुट्टी : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Share

जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने , विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, खानापुर, बैलहोंगल, कित्तूर, चिक्कोडी आणि निप्पाणी येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केले होते.

व्हॉइस ओव्हर पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी २५ आणि शुक्रवारी २६ जुलै असे आणखी दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, यासह खानापुर, बैलहोंगल, कित्तूर, चिक्कोडी आणि निप्पाणी तालुक्यातील शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे सुट्टीचा प्रस्ताव पाठवला होता त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेत पुन्हा दोन दिवस सुट्टी वाढवली आहे.

Tags: