सीमाभागात आपल्यावर खटले सुरु आहेत. वॉरंट देखील आहे. पण तरीही आम्ही सीमाभागात जातो. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री सीमाप्रश्न आणि सीमावासीयांकडे पाठ फिरवत आहेत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
आज बेळगाव मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना खास. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सीमाप्रश्न सोडवतील अशी आशा सीमाभागातील नागरिकांना आहे. मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवणे ही सीमावासियांची मोठी चूक आहे. सीमासमन्वयक मंत्री असताना एकनाथ शिंदे, चंद्रकांतदादा पाटील यांनी सीमाभागाला का भेट दिली नाही? सीमावाद सोडविण्यासाठी अनेक आंदोलने झाली. सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात खुद्द मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. मात्र आता सीमाप्रश्नाविषयी त्यांना आस्था का नाही? सीमाप्रश्नी त्यांना आस्था असती तर सर्वोच्च न्यालयालात वकील का हजर राहात नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना खास. संजय राऊत यांनी सीमाप्रश्नी केलेल्या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा सीमाप्रश्न चर्चेत आला असून संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतील? याकडे सीमावासीयांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments