गोकाक पाश्चापूर रोडवर शाळेची बस पलटी होऊन विद्यार्थी जखमी जखमी झाले आहेत.
गोकाक तालुक्यातील मरडीमठ गावातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची बस मावनूर, गोडचिनमल्की आणि मेलमट्टी गावातील विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना ही घटना घडली. बस पलटी होऊन पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून इतर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी भेट देऊन तपास केला.
गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा निवेदन देऊनही काम होत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.


Recent Comments