Belagavi

भाजप सरकारच्या काळातील महामंडळ घोटाळ्यांची एसआयटी करा स्थापन : भीमप्पा गडाद

Share

भाजपच्या काळातही महामंडळे आणि विभागांमध्ये घोटाळे झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन न केल्यास चालू अधिवेशनात सरकारविरोधात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी दिला आहे.

चालू अधिवेशनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कागदपत्रांसह भाजप सरकारच्या काळात 21 विविध महामंडळे आणि विभागांमध्ये घोटाळा झाल्याचे सभागृहात नमूद केले. याविरोधात एसआयटी स्थापन करून तपास करण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा. अन्यथा राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल.

या संदर्भात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , कायदा मंत्री आणि गृहमंत्री आणि सरकारचे मुख्य सचिव यांना आधीच पत्र लिहून विनंती केली आहे. या घोटाळ्यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन न केल्यास सरकारविरोधात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी दिला आहे.

Tags: