राजा लखमगौडा विधी महाविद्यालयाच्या कन्नड बळग विभागातर्फे आयोजित आठवडाभर चाललेल्या “कन्नड नुडी वैभव कार्यक्रम” चा समारोप सोहळा सोमवारी पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून धारवाडचे शिक्षण तज्ज्ञ सुरेश व्ही कुलकर्णी उपस्थित होते . व त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून कन्नड भाषेचे महत्त्व सांगितले. कन्नड भाषेला प्रोत्साहन द्या, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

असे आणखी कार्यक्रम व्हायला हवेत, असे महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एम.आर.कुलकर्णी यांनी सांगितले. कन्नड भाषेचा विकास यामुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एच. हवालदार अध्यक्षस्थानी होते व त्यांनी कन्नड भाषेच्या व्याप्तीचे महत्त्व विशद केले. महाविद्यालयाच्या कन्नड बळग विभागातर्फे विविध स्पर्धांसह 9 दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments