कित्तूर तालुक्यातील मोकाशी सरकारी माध्यमिक शाळेत आज मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या ५२ वा वाढ़दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.

कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य तसेच रोपट्याचे वाटप करण्यात आले.
हुलिकट्टी गावातील आमदार अभिमानी संघाच्या वतीने मोगप्पाण्णा मन्नीकेरी यांच्या अध्यक्षतेखाली महांतेश लोकूर यांच्या नेतृत्वाखाली शालेय विद्यार्थ्यांना रोपवाटप आणि शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रापं सदस्य मुदकप्पा कुरी आणि पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

मुख्याध्यापक जी .एच. नायक यांनी देखील आमदार अभिमानी संघाचे आभार मानले. या उपक्रमाचा २०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.


Recent Comments