Belagavi

बेळगावात पारस सौहार्द सहकारी बँकेचा शुभारंभ

Share

बेळगावात नव्याने सुरू झालेल्या पारस सहकारी सौहार्द सहकारी बँकेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. अनगोळ मेनरोडवर हरिमंदिरासमोरील मालिनी प्लाझा येथे पारस सौहार्द सहकारी बँकेचा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलतांना भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी आमदार अभय पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले की, आम्हाला सत्य माहीत आहे. त्यामुळे कोणत्याही तपास यंत्रणेला आम्ही घाबरत नाही. आमच्या घरावर छापा टाकला तरीही काहीच सापडणार नाही. बेळगाव सहकार क्षेत्रात अग्रेसर आहे. सहकार क्षेत्रामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक स्थिती सुधारते. आमदार अभय पाटील यांनी राजकारणासोबतच गरीब व मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली असून त्यांच्या या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात अधिक सहकारी संस्था आहेत. हे देशाच्या विकासाला पूरक आहे. आमदार अभय पाटील यांचा विकासाबद्दल नवा दृष्टिकोन आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व कामांना यश आले असून सहकार क्षेत्रातही ते यशस्वी होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला.

केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे बोलताना म्हणाले, बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघाची प्रतिमा आमदार अभय पाटील यांनी बदलली आहे. आता त्यांनी सहकार क्षेत्रात पदार्पण केले आहे. देशाचा आर्थिक स्तर सुधारण्यात सहकारी संस्थांची भूमिका मोठी आहे, असे ते म्हणाले.  माजी आमदार संजय पाटील यांनी आमदार अभय पाटील यांच्या पाठीमागे ‘भावांची ताकद’ असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या उद्धारासाठी आमदार अभय पाटील यांनी नवे पाऊल उचलले आहे. त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पारस सोसायटी सुरू करण्यात आली. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी पारस सोसायटी काम करेल, असा विश्वास आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

Tags: