के. एल.ई. संस्थेच्या बी. व्ही. बेल्लद लॉ महाविद्यालयाच्या वतीने मोफत डेंग्यू प्रतिबंधक लसीचे वितरण करण्यात आले.
हिंडलगा येथील ग्रामपंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत मोफत लसीकरण करण्यात आले, याचा लाभ १००० हुन अधिक नागरिकांनी घेतला. के. एल. इ. होमिओपॅथिक विद्यालयाच्या डॉक्टरांच्या सहकार्यातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी बी. व्ही. बेल्लद महाविद्यलयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



Recent Comments