Belagavi

बेळगाव, खानापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

Share

मुसळधार पावसामुळे बेळगाव तसेच खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 22 जून आणि 23 जून रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी खानापूर तसेच बेळगाव तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना 22 आणि 23 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केला आहे.

सर्व शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना सुट्टी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Tags: