महाराष्ट्रातून चिक्कोडी तालुक्यातील नद्यांमध्ये 1 लाख क्युसेक पाणी येत असले तरी आलमट्टी जलाशयातून 1 लाख क्युसेक पाणी सोडले जात असल्याने पूर येण्याची भीती नाही, असे कर्नाटकचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, यांनी सांगितले. .

चिक्कोडी विधानसभा मतदारसंघातील इंगळी, मांजरी, येडूर , चंदूर टेक या गावातील नदीकाठच्या गावातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सांगितले की, महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा, वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. पाणी वाढले असले तरी पुराची भीती नाही. पुरापासून बचावाचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांमध्ये बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. असे आमदार प्रकाश हुक्केरी म्हणाले.
यावेळी सिद्राम शेळके, संजय कुडचे, रमेश मुरचटे, हुवण्णा चौगले, गणपती धनवाड, पांडुरंग माने, संजय नरवडे, पोपट लंकाणे, बाळू धनगर, शिवानंद करोशी, महेश कागवडे, संजू पिराज, बलवन्त , सुनील पाटील , शशिकांत पाटील सिद्धू मगदूम आदी उपस्थित होते


Recent Comments