Udupi

उसळलेल्या समुद्रामुळे जमिनीची धूप ; मंत्री हेब्बाळकर यांनी केली पाहणी

Share

महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आणि उडुपी जिल्ह्याच्या प्रभारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उडुपीच्या पाडू तोन्से ग्रामपंचायत अंतर्गत गुज्जरबेट्टू गावाला भेट दिली आणि समुद्राच्या लाटांमुळे प्रभावित क्षेत्राचे निरीक्षण केले.

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री तथा उडुपी जिल्हा पालक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी उडुपीच्या पाडूतोन्से ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गुज्जरबेट्टू गावाला भेट दिली आणि समुद्रामुळे धूप झालेल्या भागाची पाहणी केली .

यावेळी उडपी च्या जिल्हाधिकारी डॉ.के.विद्याकुमारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.के.अरुण, जिल्हा पंचायत सीईओ प्रतीक बयाल, कुंदापूर विभागाच्या सहायक आयुक्त एस. आर. रश्मी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: