जगातील सुप्रसिद्ध अशा ब्रँडेड कपड्यांची शोरूम “बिईन्ग ह्युमन ” बेळगावमधील डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील बीम्स मेडिकल कॉलेज समोर आजपासून सुरु करण्यात आली आहे .
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्याब्रँडेड कपड्यांच्या “बिईन्ग ह्युमन ” शोरूमच्या देशविदेशात अनेक शाखा आहेत . आज या शोरूमच्या शाखेचा बेळगाव मध्ये सांकेतिक पूजा करून शुभारंभ करण्यात आला . अभिषेक कुलकर्णी आणि प्रियांका कुलकर्णी यांनी बेळगावात हे शोरूम सुरु केली आहे . या शोरूम मधील तयार कपड्यांची खासियत खूप खास आहे . इथले कपडे परिधान केल्यानंतर व्यक्तीचे व्यकितमत्व अधिक खुलून दिसते . बेळगाव दुसरी राजधानी म्हणून ओळखले जाते . या ठिकाणी अनेक विकास होत आहेत . तसेच देशातील ब्रँडेड कंपनीचे कपडे उपलब्ध होणारे दुकान इथे सुरु होत असल्याने बेळगाववासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे .
यासंबंधी इन न्यूजशी बोलताना प्रियांका कुलकर्णी यांनी , बेळगावमधील लोकांना उत्तम दर्जाचे कपडे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आम्ही बेळगावमध्ये “बिईन्ग ह्युमन ” ची शाखा सुरु करीत आहोत . एकदा दुकानाला जरूर भेट द्या असे आवाहन केले .

“बिईन्ग ह्युमन ” चे रामायण सिंग यांनी देखील “बिईन्ग ह्युमन ” सामाजिक कार्याबरोबरच कपड्यांची दुकाने चालवत आहे . खास बेळगावकरांसाठी आम्ही हे स्टोअर सुरु केले आहे . खास तरुण पिढीसाठी वैविध्यपूर्ण रेडिमेड कपडे उपलब्ध करून दिले आहेत .
यावेळी ऍड . ए जी कुलकर्णी , संजय कुलकर्णी आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते .


Recent Comments