Belagavi

सार्वजनिक शिक्षण विभागाच्या बेळगाव कार्यालयाला उपसंचालक नसल्याने अराजकता

Share

सार्वजनिक शिक्षण विभागाच्या बेळगाव कार्यालयाला उपसंचालक नसल्याने गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षण विभागात अराजकता माजली आहे. सध्या पावसाळा सुरु असून , इथले कर्मचारी गळक्या छतामुळं कार्यालय छत्री घेऊन शैक्षणिक कर्तव्ये पार पाडत असल्याचे निदर्शनास येत आहे
व्हॉइस ओव्हर ; नवीन शैक्षणिक वर्षातही या कार्यालयाला उपसंचालक मिळाले नाहीत. सध्या पावसाळ्यात कार्यालयात गेल्यास कर्मचारी गळती असलेल्या छताखाली छत्री घेऊन शैक्षणिक कर्तव्ये पार पाडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या शिक्षण विभागाबाबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. जिल्ह्यातील बहुतांश तालुका शिक्षणाधिकारी आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत. शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शाळा ओस पडल्या आहेत. बहुतांश शाळांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. असे असतानाही शिक्षण विभाग जिल्ह्यात 8 महिन्यांपासून बेघर आहे.

राज्य सरकार व शिक्षणमंत्र्यांनी तातडीने बेळगाव जिल्ह्यातील शिक्षणावर लक्ष केंद्रित करून कार्यक्षम व प्रामाणिक उपसंचालकाची नियुक्ती करावी. पावसामुळे गळती होत असलेल्या डीडीपीआय कार्यालयाला कायमस्वरूपी दिलासा द्यावा, असे येथील कर्मचाऱ्यांचे मत आहे.

Tags: