Bailahongala

बैलहोंगलमधील पंपसेट चोर जेरबंद

Share

बैलहोंगल तालुक्यातील मलप्रभा नदीकाठच्या शेतातील पंपसेट चोरी करून फरार झालेल्या आरोपींना पकडण्यात बैलहोंगल पोलिसांना यश आले आहे.

नयानगर गवानजीकच्या मलप्रभा नदीकाठच्या शेतजमिनीतून १० पंपसेट चोरी करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास घेत बैलहोंगल पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असून याप्रकरणी माळापूर खाद्री गल्ली येथील रहिवासी मोहम्मदनदिम महंमदहनीफ हेब्बळ्ळी (३३), रियाझ रफिक कारागार (२८), समीर नजीर हेब्बळ्ळी (२१) झाकीरहुसेन नूरअहमद मालदार (२५) या आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे 10 पंपसेट जप्त करण्यात आले आहेत. तसेच 3 लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन जप्त करण्यात आले आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी बैलहोंगल पोलीस स्थानकाचे सीपीआय पंचाक्षरी सालीमठ, पीएसआय गुरुराज कलबुर्गी, एफ. वाय. मल्लुर यांच्या नेतृत्वाखाली एस. यु. मेणसीणकाई, चेतन बुदनि, एम. बी. कंबार, एम. एस. देशनुर, टेक्निकल विभागाचे कर्मचारी विनोद ठक्कण्णावर, सचिन पाटील आदींनी कारवाईत सहभाग घेतला. त्यांच्या या कार्याचे बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांच्यासह बैलहोंगल मधील शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे.

Tags: