शिवशरण, वचनकार, श्री हडपद अप्पण्णा यांची तत्वे सध्याच्या समाजाला पूरक असून त्यांच्या विचारधारा प्रत्येकाने अंगीकारल्या पाहिजेत, असे मत प्रा. अविनाश कवी यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर पालिका व कन्नड व सांस्कृतिक विभागाच्यावतीने शिवशरण हडपद अप्पण्णा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हडपद अप्पाण्णा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी विविध मार्गावरून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावमधील कुमार गंधर्व कलामंदिरात आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. अविनाश कवी यांनी हडपद अप्पण्णा यांच्याविषयी माहिती दिली. हडपद अप्पण्णा हे १२व्या शतकातील पहिले वचनकर्ते होते. त्यांनी वचनांच्या माध्यमातून मोठा बदल घडवून आणला. त्यांनी रचलेली 200 हून अधिक वचने समाजासाठी दिशादर्शक असून त्यांनी तळागाळातील समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, डॉ.अविनाश कवी, रूपा खडगावी, इरन्ना देयन्नावार, अनंतकुमार ब्याकोड, बसवराज रोट्टी, प्रेमा चौगला, आनंद गुडस, रावसाहेब पाटील, विजयकुमार होन्नकेरी आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments