महाद्वार रोड क्रॉस नं. ३ येथील श्री ज्ञानेश्वर विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वतीने सालाबादप्रमाणे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका सौ वैशाली हुलजी आणि नगरसेविका नेत्रावती भागवत यांच्या हस्ते अभिषेक आणि आरती करण्यात आली. यानंतर अध्यक्ष मारुती जोशीलकर यांच्या हस्ते माऊलींच्या पालखीचे पूजन करण्यात आले. पालखीची नगर प्रदक्षिणा सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम कपिलेश्वर मंदिर येथे ट्रस्टींच्या हस्ते पालखीचे आरती करून स्वागत करण्यात आले. यानंतर शनी मंदिर, सोन्या मारुती, आरटीओ सर्कल, ताशिलदार गल्ली, तानाजी गल्ली, आपटेकर गल्ली मार्गे पालखीचे मंदिरात आगमन झाले.
कपिलेश्वर मंदिरात आरती कार्यरकामावेळी खिचडी आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुर्गादेवी हरिपाठ भजनी महिला मंडळ सोनोली यांनी टाळ मृदुंगांच्या गजरात भजन सादर केले.यावेळी गल्लीतील युवा वर्ग, बालगोपाळ, महिला, मंदिराचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.


Recent Comments