गोकाक तालुक्यातील पामळदीन्नी गावात मोठा अपघात झाला आहे. दारू बनवताना झालेल्या अपघाती स्फोटामुळे मल्लप्पा सत्यप्पा कंकणवाडी (३८) नावाच्या व्यक्तीचे सजीव दहन झाल्याची घटना घडली आहे .
मल्लप्पा पंचमीसाठी मद्य तयार करत असताना अचानक स्फोट झाला आणि ही दुर्घटना घडली. घटप्रभा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटप्रभा पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली.
या घटनेने आजूबाजूच्या लोकांमध्ये भीती पसरली असून या घटनेने सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज काय यावरही प्रकाश टाकला आहे.
Recent Comments