देशातील अल्पसंख्याक आणि मुस्लिमांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी बेळगावात एसडीपीआय संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.
शुक्रवारी बेळगावातील राणी चेन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एसडीपीआय संघटनेतर्फे विशालगड मशिदीच्या विध्वंसाचा निषेध करत मोर्चा काढण्यात आला .

देशात भाजपचे सरकार आल्यापासून अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय होत आहेत. देशात शांतता नाही. या अन्यायाविरोधात एसडीपीआयने देशभरात निदर्शने केली आहेत. अल्पसंख्याक आणि दलितांवरील अत्याचार त्वरित न थांबविल्यास हिंसक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
यासंदर्भात बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एसडीपीआय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.


Recent Comments