Belagavi

डॉ. रामण्णावर यांनी दाखविली भूतदया!

Share

डॉ. रामण्णावर हे नेहमीच सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. आज त्यांनी एका मृत कोल्ह्यासंदर्भात दाखविलेल्या भूतदयेचे कौतुक होत आहे.

बैलहोंगलपासून बेळगावला येताना रस्त्यावर कोल्हा पडल्याचे त्यांना दिसले. त्याचक्षणी त्यांनी गाडीतून उतरून कोल्ह्याला तपासले. मात्र कोल्ह्याचा जीव आधीच गेला होता. या रस्त्यावरून असंख्य वाहने येऊन कोल्ह्याला चिरडून जातील याचा विचार करून मृतावस्थेत कोल्ह्याला त्यांनी रस्त्याशेजारी ठेवले. माणसाने प्राण्यांचाही विचार करून भूतदया दाखवावी असे आवाहन त्यांनी केले.

Tags: