यमकनमर्डी मतदारसंघातून 10 कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचा शुभारंभ खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी केला
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 10 कोटी रुपयांच्या अनुदानातून यमकनमर्डी मतदारसंघातील विविध गावांतील रस्त्यांच्या कामांच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना खास. प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या, ग्रामीण भागात रस्त्यांचा विकास झाला तर ते प्रगतीचे लक्षण आहे. ग्रामीण भाग हा देशाचा प्राण आहे. त्यामुळे गावांची प्रगती दिसली तरच देशाचा विकास शक्य असल्याचे खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. मंत्री सतीश जारकीहोळी यांची दूरदृष्टी आणि प्रयत्नांमुळे यमकनमर्डी मतदारसंघातील ९० टक्के रस्ते विकसित झाले आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित 10 टक्के रस्त्यांचा विकास केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी खासदार प्रियंका जारकीहोळी यांचा यमकनमर्डी मतदारसंघातील मावनूर, परकनहट्टी, काळबामवी, गुटागुड्डी, मुदगा, खवणीवाडी, दोंडागट्टी येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सतीश शुगर्सचे संचालक, युवा नेते राहुल जारकीहोळी, माजी जिल्हा पंचायत सदस्य यल्लाप्पा हंचीनमनी, मारुती गुटागुड्डी, लगमण्णा पानगुड्डी, दयानंद पाटील, बसवानी मुकनाळ, रामचंद्र नायक, फकिराप्पा हुंद्री, बारिश मुखनवार, सुरेश हरिजन, चंद्रकांत पाटील , स्मिता कोकितकर, गीता बगाडी, शोभा गुडगनट्टी आदी उपस्थित होते.
Recent Comments