DEATH

धारवाडमध्ये नवजात शिशूचा मृत्यू, डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचा संशय

Share

धारवाड जिल्ह्यातील एका ५ महिन्यांच्या नवजात शिशूचा डेंग्यूच्या तापामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

धारवाड तालुक्यातील मुम्मीगट्टी गावात डेंग्यू तापाने एका ५ महिन्याच्या नवजात शिशूचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदर बाळाला धारवाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र यादरम्यान डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

धारवाडमधील पोलीस हवालदार गोपाल लमाणी यांची पाच महिन्यांची मुलगी आराध्या हिला डेंग्यूची लागण झाल्याचा संशय आला होता. त्यामुळे आराध्याला उपचारासाठी धारवाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्याने सदर मुलीचा मृत्यू झाला आहे. गोपाल लमाणी हे मूळचे गदग जिल्ह्यातील गजेंद्रगडचे आहेत.

Tags: