प्रीती संगम ग्रुप बेळगाव आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला “तीर्थ विठ्ठल – क्षेत्र विठ्ठल” हा अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बुधवारी सायंकाळी बेळगावच्या सरस्वती वाचनालयातील माई ठाकूर सभागृहात प्रीती संगम ग्रुप बेळगाव व लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात गायिका सायली नाईक यांनी आपल्या सुरेल आवाजात अभंग आणि भक्तिगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार तसेच बसवराज बिज्जरगी, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता चोळचगुड्ड यांनी दीपप्रज्वलन करून संगीत संध्याचे उद्घाटन केले. त्यानंतर नम्रता जांबोटकर यांनी लोकमान्य सोसायटीचे प्रगतीचा आढावा आणि सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांच्याबद्दल माहिती दिली. गजानन कुलकर्णी, सुधींद्र बोंद्रेशेखर प्रभू-खानोलकर यांनी वाद्यांची साथसंगत दिली. तर अनुजा कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले.


Recent Comments