Belagavi

विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली!

Share

आज आषाढी वारीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज पहाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा शासकीय पूजा पार पाडली.

यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत असं विठुरायाचरणी साकडं घातलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. ते मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. . दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्याची अतुरतेने वाट पाहत असतात. आज चंद्रभागेच्या तिरावर वारकऱ्यांचा सोहळा भरला होता. वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या मॉडेलवर पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी तीन कोटी रुपयांच्या अनुदानातून विकासकामे केली जातील, अशी ग्वाही दिली.

Tags: