Dharwad

धारवाडमध्ये इराणी समाजाकडून अनोख्या पद्धतीने मोहरम साजरा

Share

त्याग आणि बलिदानाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या मोहरम सणानिमित्त धारवाडमध्ये इराणी समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने मोहरम साजरा करण्यात आला.

हसीन हुसेन यांच्या बलिदानाचे आणि त्यागाचे स्मरण करत येथील इराणी समाजाच्या नागरिकांनी शरीरावर ब्लेडने वार करून मोहरम साजरा केला. त्यागाचा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न इराणी समाजाने केला.

धारवाडमधील या पद्धतीमुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे उभारले. यावेळी मोहरम सणानिमित्त इराणी समाजाच्या लोकांनी जनता नगर ते होसयल्लापूर अशी पंजा मिरवणूक काढली. या मिरवणुकीत त्यांनी छातीवर ब्लेडने वार करून रक्त सांडून बलिदानाचे स्मरण केले.

Tags: