हुक्केरी तालुक्यातील पाश्चापूर गावात मोहरम सण साजरा करताना ताबूत मिरवणुकीदरम्यान दोन गटातील क्षुल्लक कारणावरून झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या ताबूत मिरवणुकीत दोन गटात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. याचे रूपांतर पुढे गोंधळात होऊन जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे एएसआय मुरागोड आणि घटनास्थळी उपस्थित असलेले एक पोलिस हवालदार जखमी झाले . यावेळी जमावाला पांगणवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.


Recent Comments