Belagavi

जन्म-मृत्यू दाखला – नोंदणी विभागाला मनपा आयुक्तांची भेट : काउंटर वाढविणार

Share

बेळगावातील जनतेला जन्म-मृत्यूचे दाखले काढण्यासाठी होणारा त्रास टाळण्यासाठी अखेर मनपा पुढे सरसावली असून लोकांच्या समस्या लक्षात घेऊन आयुक्तांनी काउंटरची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बेळगावची लोकसंख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. इथला जन्म आणि मृत्यू दरही तसाच आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात जन्म-मृत्यू दाखला काढण्यासाठी बेळगाव महापालिकेत एकच काउंटर असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. जन्म-मृत्यूच्या नोंदी, अद्ययावत नोंदी घेण्यासाठी दररोज गर्दी वाढत होती. हि बाब लक्षात घेत आज मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्वत: काउंटरला भेट देऊन लोकांची व कर्मचाऱ्यांची अडचण ओळखून काउंटरची संख्या वाढविण्याचा विचार केल्याने बेळगावकरांनी समाधान व्यक्त केले.

Tags: