आषाढवारी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविक आतुरलेला असतो. आज बेळगावमधील राजहंसगडाचे वारकरी आणि भाविक आषाढयात्रेसाठी पंढरपूरला रवाना झाले.
आषाढी एकादशी जसजशी जवळ येईल तशी प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाच्या दर्शनाची ओढ खुणावत असते, त्यामुळे महिनाभर अगोदर पासूनच पंढरपूरला जाण्याची लगबग वारकऱ्यांत दिसून येते. बेळगाव तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी समजल्या जाणाऱ्या राजहंसगड गावातील वारकरी व भाविकसुद्धा बुधवारी होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त आज राजहंसगड गावातून पंढरपूरला रवाना झाले.
यावेळी सालाबादप्रमाणे राजहंसगड वारकऱ्यांचा दिंडी सोहळा दिमाखात पार पडला. गावातील विविध गल्लोगल्ली पार पडलेल्या दिंडी सोहळ्यानंतर सर्व वारकरी आणि भाविक पंढरपूरला रवाना झाले. दिंडी सोहळ्यासाठी माजी तालुका पंचायत सदस्य सिध्दापा छत्रे, माझी ग्रामपंचायत उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य दत्ता पवार,

शंकर हलगेकर, शेखर हिरेमठ, कलाप्पा बस्तवाडकर, भावकांण्णा कणबरकर, पिंटू कुंडेकर, महादेव थोरवत, विठ्ठल हावळ यांच्यासह अनेकांनी कठोर परिश्रम घेतले.


Recent Comments