बेळगाव महापालिकेच्या चार स्थायी समित्यांवर निवड झालेल्या नूतन अध्यक्षांचा शपथविधी आज पार पडला.
बेळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष निवड प्रक्रिया कोणत्याही विरोधाशिवाय पार पडली. आज महापौर सविता कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अर्थ स्थायी समिती अध्यक्षपदी नेत्रावती भागवत, आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीशैल कांबळे, नगररचना स्थायी समिती अध्यक्षपदी जयतीर्थ सौंदत्ती, लेखा समिती अध्यक्षपदी रेश्मा कामकर यांनी शपथ घेतली. यावेळी मनपा कार्यालयाच्या आवारात नियुक्ती झालेल्या स्थायी समिती अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केले.

यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, भाजप जिल्हाध्यक्षा गीता सुतार आदी उपस्थित होते.


Recent Comments