नीट परीक्षेत कमी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालून फसवणाऱ्या राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
विविध राज्यांसह बेळगावमधील विद्यार्थ्यांचीही फसवणूक करून केवळ बेळगावमधूनच जवळपास १० विद्यार्थ्यांची फसवणूक करून तब्बल १.८० कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या तेलंगणातील अरगोंडा उर्फ अरविंद आलियास अरुण कुमार नामक व्यक्तीला बेळगाव मार्केट पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे, या आरोपींला अटक करण्यात मार्केट पोलिसांना यश आले असून आरोपीकडून 12 लाख रोख रकमेसह संगणक, लॅपटॉप आणि इतर 12,66,900 रुपये किमतीचे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांनी दिली. आज मार्केट पोलीस स्थानकात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशात एकीकडे नीट परीक्षेच्या घोटाळ्याने धुमाकूळ घातला असताना, याचे भांडवल करून परीक्षेत कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना टार्गेट करून करोडो रुपये घेऊन पलायन केले. मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल होताच, बेळगाव मार्केट पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याला मुंबई येथे अटक केली. या प्रकरणातील अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी हा मूळचा हैद्राबादचा असून त्यांने बेळगाव मधील अनेक विद्यार्थ्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


Recent Comments