Belagavi

पंतबाळेकुंद्री येथे रस्ते विकास कामाचा शुभारंभ

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पंत बाळेकुंद्री गावात रस्त्यांच्या विकास कामाचे उद्घाटन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

ग्रामीण मतदार संघाच्या अखत्यारीत येणाऱ्या पंत बाळेकुंद्री येथे ५० लाख रुपयांच्या खर्चातून रस्त्यांचे विकासकाम हाती घेण्यात आले असून जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली. या भागात जाहीर करण्यात आलेल्या अनुदानाच्या रकमेतून काँक्रीटीकरण, गटार बांधकाम अशी कामे करण्यात येणार आहेत. यादरम्यान जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी विकासकाम विहित मुदतीत तसेच गुणवत्तापूर्ण करण्यात यावे, अशा सूचना चन्नराज हट्टीहोळी यांनी ठेकेदाराला दिल्या.

यावेळी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष गुलाब ए. कोलकर, उपाध्यक्षा बी.बी अनिफा, सदस्य पार्वती तलवार, मैनुद्दीन अगसिमानी, मोहम्मद जमादार, मल्लिक मणियार, जमादार, होनगौड पाटील, जमील काझी, प्रवीण पाटील, दत्तू कोळकर, मारुती कांबळे आदी उपस्थित होते.

Tags: