ARREST

हिरेबागेवाडीत दुचाकी चोराला अटक

Share

दुचाकी चोरीप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

बैलहोंगल तालुक्यातील आझाद मेहबुब सुभानी किल्लेदार यास अटक करण्यात आली असून , हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मेहबुब सुभानी किल्लेदाराला अटक केली . त्याच्याजवळून हिरो कंपनीच्या 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत .
याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Tags: