डॉ. प्रभाकर कोरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाचे कारण हायकमांडच्या नेत्यांचे निर्णय असल्याचे सांगत संताप व्यक्त केला.

रामदुर्ग येथे आयोजित नूतन खासदार जगदीश शेट्टर यांच्या सत्कार समारंभात बोलताना प्रभाकर कोरे म्हणाले की, राज्यात भाजपची सत्ता आली नाही याला कारण म्हणजे , भाजपने महादेवप्पा यादवाड यांच्यासारख्या अनेकांना तिकीट न देता दूर ठेवण्यात आले. भाजप सत्तेत आला नाही कारण त्यांनी त्यांना दूर ठेवले. सरकार बनवायचे असेल तर महादेवप्पा यादवाड सारख्या लोकांना जवळ ठेवावे. मी त्याना सुरुवातीपासून पाहत आलो आहे. मात्र आता तिकीट का चुकले, ते नंतर सांगू, असे डॉ.प्रभाकर यांनी व्यक्त केला.


Recent Comments