Belagavi

भटक्या विमुक्त समाजातील पालकांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे : पल्लवी जी

Share

 

भटके विमुक्त व अर्ध-भटके जमातीच्या 46 पोटजाती असून, त्यांना आर्थिक व विकासात्मक उपक्रम हाती घेऊन एकाच ठिकाणी स्थायिक व्हावे यासाठी कर्नाटक भटके-विमुक्त महामंडळातर्फे विविध प्रकल्प राबविण्यात आले आहेत, असे महामंडळाच्या अध्यक्षा पल्लवी यांनी सांगितले.
व्हॉइस ओव्हर : महामंडळाच्या अध्यक्षा पल्लवी जी. यांच्यासमवेत बेळगावच्या सर्किट हाऊसवर भटक्या विमुक्त जमातीच्या प्रमुखांची बैठक झाली. अनुसूचित जाती-जमातीच्या भटक्या-विमुक्तांच्या विकासाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

एससी, एसटी विकास महामंडळाच्या अध्यक्षा पल्लवी जी म्हणाल्या की, बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भटके विमुक्त समाज आहेत, भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी महामंडळ मदत करत आहे, प्रत्येक जिल्ह्यात फिरून भटक्या विमुक्तांची स्थिती व समस्या जाणून घेत आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांची माहिती देत समाजातील पालकांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे. भटक्यांना घर, स्वयंरोजगार, जीवनात सर्वांगीण सुरक्षितता मिळावी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. सरकार प्रत्येक स्तरावर विशेषाधिकार देत असून त्याचा उपयोग झाला पाहिजे. असे त्या म्हणाल्या .

भटक्या विमुक्तांचे जिल्हाध्यक्ष भजंत्री म्हणाले की, भटक्या-विमुक्त जातीजमातींमध्ये मध्ये एकूण 46 जाती जमाती आहेत, सर्व समाजाला मूलभूत सुविधा मिळाव्यात, आंबेडकर महामंडळाप्रमाणेच भटक्या विमुक्तांनाही तेवढाच निधी मिळावा. , भटक्या विमुक्तांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, भटक्या विमुक्तांना शासनाकडून सुरक्षा देण्यात यावी, परिस्थिती व समस्या तपासून अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक भटके-विमुक्त महामंडळाच्या बैठकीत समाज कल्याण विभागाचे सहसंचालक नवीन शिंत्रे, भटक्या विमुक्त जिल्हाध्यक्ष भजंत्री, बसवराज शिंघटी, रविकुमार, यल्लाप्पा, बाळेश, मुथप्पा आदी उपस्थित होते .

Tags: