IN NEWS IMPACT

इन न्यूज इम्पॅक्ट : आमदार महेंद्र तम्मणावर यांची रायबाग शहरातील ग्रामीण भागातील शाळेला भेट

Share

रायबाग शहरातील ग्रामीण भागातील पुजारी तोट येथील शासकीय प्राथमिक शाळेत मूलभूत व्यवस्था नसल्याचे वृत्त इन न्यूजमध्ये प्रसारित करण्यात आले होते, हा अहवाल पाहून कुडची मतदारसंघाचे आमदार महेंद्र तम्मण्णावर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. शाळेची वास्तविक स्थितीची पाहणी केली .

रायबाग विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील पुजारी तोट येथील शासकीय प्राथमिक शाळेतील अनागोंदीचे वृत्त नुकतेच आमच्या इन न्यूज वाहिनीवर प्रसारित झाले होते, ही बातमी पाहताच , कुडचीचे आमदार महेंद्र तम्मणावर यांनी , शाळेला भेट देऊन पाहणी केली. एसडीएमसी तसेच , ग्रामपंचायत सदस्य आणि विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आमदारांनी शाळेची समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व शिक्षणमंत्र्यांशी बोलून ती सोडविण्याचे आश्वासन दिले.

तरीही रायबाग विधानसभा मतदार संघाचे आमदार दुर्योधन ऐहोळे हे अशा समस्या दिसल्यास तातडीने भेट देऊन समस्या सोडवतात, मात्र या शाळेची अवस्था अशी झाली असतानाही त्यांनी या शाळेला भेट का दिली नाही, असा प्रश्न मतदार संघातील जनतेचा आहे.

Tags: