बेळगाव शहरात आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे वाहनधारक अडकून पडले.
बेळगावमध्ये ,अगदी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचले होते . मुख्य रस्त्यांवरदेखील पाण्याचे लोट वाहत असल्याने , वाहनधारकांचे हाल झाले.
नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत नसल्याने बेळगावातील गांधी नगर, उज्ज्वल नगर, जुना पीबी रोड, महांतेश नगर पूल या भागात पाणी साचले असून, वाहनांची ये-जा करणे कठीण झाले आहे.


Recent Comments