गोंधळी समाजाच्या वतीने , श्री मरगाई देवीची जत्रा मोठ्या उत्साहात आणि धार्मिकतेने पार पडली . बेळगावमधील सुभाष नगर येथील श्री मरगाई देवीची जत्रा गेल्या ३० वर्षांपासून साजरी करण्याची परंपरा आहे . दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढ महिन्यात गोंधळी समाजाच्या वतीने ही जत्रा साजरी करण्यात आली . सुवासिनींनी कलश मिरवणूक , त्याचप्रमाणे , संबळ , तुणतुणे आदींच्या वाद्यघोषात , मिरवणुकीने मंदिरात जाऊन , श्री मरगाई देवीची ओटी भरण्यात आली . त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला .
यावेळी बेळगाव गोंधळी समाजाचे अध्यक्ष कृष्णा माने , उपाध्यक्ष सतीश भिशे , बेळगाव जिल्हा गोंधळी समाज प्रधान कार्यदर्शी गोपाळ भिशे , बसवराज माने , तुकाराम मुत्तोडकर , पंडित भिशे , श्रीकांत भीशे , नारायण भीशे , भीमराव चित्रकार , सुनील वाघमोडे , महिला मंडळ अध्यक्षा नितु भीशे , उपाध्यक्ष माधुरी रांगणेकर , सुनंदा भीशे , राजश्री भीशे आणि इतर उपस्थित होते .


Recent Comments