कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित दुसऱ्या रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि केंद्रीय विद्यालय झोनल चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा शिवमोग्गा आणि बेंगळुरू 7 ते 11 जुलै 2024 येथे पार पडली.बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्सनी या स्पर्धा मध्ये सहभाग घेतला होता.या स्पर्धेत ४०० च्या वर स्केटर्सनी सहभाग घेतला होता बेळगावच्या स्केटर्सनी 4 सुवर्ण 3 रौप्य 2 कांस्य पदके जिंकली
स्पीड स्केटिंग २ रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये जान्हवी तेंडुलकरने २ सुवर्ण १ रौप्य केंद्रीय विद्यालय झोनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सत्यम पाटीलने 2 सुवर्ण , कुलदीप बिर्जेने 2 रौप्य तर श्री पाटीलने 2 कांस्य पदके पटकावली .
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येळुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत असुन या सर्व स्केटर्सना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस केआरएसए, यांचे प्रोत्साहन लाभत आहे


Recent Comments