Belagavi

विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची बेळगुंदीला भेट : हायटेक स्टेडियमच्या जागेची केली पाहणी

Share

विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी शनिवारी बेळगुंदी गावाच्या बाह्य भागात बांधण्यात येणाऱ्या हायटेक स्टेडियमच्या जागेची पाहणी केली.

मतदारसंघाच्या आमदार असलेल्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे क्रीडा विभागाच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिले मल्टी स्टेडियम बांधण्यात येणार आहे.

या स्टेडियममध्ये क्रिकेट, कुस्ती, स्विमिंग पूल, कबड्डी, व्हॉलीबॉल आदी खेळांची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्टेडियममध्ये हायमास्क
बसवण्यात येणार असून, स्टेडियमचा दिवस-रात्र वापर करता येणार आहे. चन्नराज हट्टीहोळी यांनी यावेळी सांगितले की, या स्टेडियमची जागा लवकरच निश्चित करून कामाला सुरुवात करू.

यावेळी क्रीडा विभागाचे उपसंचालक बी.श्रीनिवास, शिवाजी बोकडे, प्रल्हादा चिरमूरकर, दयानंद गावडा, रहमान तहसीलदार, महादेव पाटील, श्याम गावडा, अजित नाईक, कृष्णा गावडा, रवी नाईक, मेहबूब मुजावर, स्वीय सहाय्यक सातेरी कोकितकर आदी उपस्थित होते. .

Tags: