शोषणामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाला एकत्रित करून समाजाचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने येत्या १४ जुलै रोजी कर्नाटक अनुसूचित जाती भटक्या विमुक्त महामंडळाची बैठक बोलाविण्यात आली आहे अशी माहिती महामंडळाच्या पहिल्या अध्यक्षा पल्लवी जी यांनी दिली.
भटक्या विमुक्त विकास महामंडळाच्या पहिल्या अध्यक्षा पल्लवी जी यांनी बेळगावात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील भटक्या जमातीचे शोषण होत असून हा समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. आजही ते जंगलात आपले जीवन जगत आहेत. २००३ साली निवृत्त न्यायमूर्ती नागमोहन दास अहवालानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि तत्कालीन समाजकल्याण मंत्री एच. अंजनेय यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती भटक्या विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. कर्नाटक अनुसूचित जाती भटक्या विमुक्त विकास महामंडळाच्या वतीने 14 जुलै रोजी सर्व नेत्यांची समन्वय बैठक बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या बैठकीत 51 अनुसूचित जाती, 23 अनुसूचित जमाती आणि 25 आदिवासी भटक्या समाजाचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महामंडळात झालेल्या घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे. सरकार तपास यंत्रणांना सहकार्य करत असून भटक्या विमुक्त समाजातील खऱ्या लाभार्थ्यांना जमिनीची मालकी द्यावी, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे असे त्या म्हणाल्या.


Recent Comments